पुस्तक : अमृतवेल लेखक: वि. स. खांडेकर प्रकाशक: सुनील अनिल मेहता प्रकाशन संस्था: मेहता पब्लिशिंग हाऊस वि. स. खांडेकरांची सुरेख, हृदयस्पर्शी, आयुष्याचे सर्व पैलू सोप्या शब्दांत उलगडून दाखवणारी ही कादंबरी. संपूर्ण तरुणाईला ही कादंबरी भुरळ घालते. काय नाही यात? आई वडिलांची ममता, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद, प्रेयसीचे प्रेम, संसाराची सोनेरी स्वप्ने पाहत असलेल्या भावी नवपरिणितीचे स्वप्नभंग, मावशीचे वात्सल्य, एका दाम्पत्यातील अतिशय टोकाचा वाद... इतका कि एकमेकांचा चेहराही पाहण्याची इच्छा नसावी, तर दुसऱ्या दाम्पत्यामध्ये इतके अफाट प्रेम कि कल्पना करूनच डोळ्यात अश्रू तरळावेत, राधाकृष्णासारखी नितळ मैत्री, एक पाषाणहृदयी आई जिने वासनेपायी आपल्याच मुलाच्या हाती मद्याचा प्याला दिला तेही अगदी १० वर्षे कोवळ्या वयात ते लेकरू असताना, एक भ्याड बाप, आणि बरेच काही जे शब्दांत मांडता नाही येत. ज्यासाठी ती कादंबरी वाचावीच लागते. एकदा हातात घेतली कि पुन्हा ठेवावीशी वाटत नाही. . . . . . .📚📖 मराठी,इंग्लिश,हिंदी सर्व साहित्य आणि कवितेसाठी आत्ताच फॉलो करा....📖📚 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 #book #books #marathibooks #mobiletobooks #marathibookreviews #marathibana #instabook #booklover #marathisahity #marathiwriter #kadmabari #bookreader #bookwriter #marathimati #marathibookstagram #read #reading #booklover #bookaddict #bookstagram #reader #books #nashik #pune # maharashtra (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CON8OPLpOmJ/?igshid=1rknga8wcklaz