ही खिडकी तिची favorite होती. बाहेरच्या white city कडे वेगळ्या रंगात बघता यायचं. लाल हिरवा निळा पिवळा रंग… बाहेरच्या जगाकडे प्रत्येक वेळी वेगळ्या रंगाने बघायचं. प्रत्येक रंगासोबत वेगळं स्वप्न.. कधी सौम्य कधी गर्द … ह्या खिडकीत बसून बाहेर बघताना हरवून जायची ती.. त्या बाहेरच्या दृश्याचे मनात कितीतरी रंगानी जग बनवलं होत तीने.. बेरंग सत्यपासून दूर… पण खुप सुंदर.. चेहऱ्यावर smile आणणारं जग… इच्छा होईल तसं वेगळ्या रंगाच्या काचेतून पाहायचं… कधीतरी कुठल्या तरी रंगाशी जास्त जवळीक होणार कधी कुठल्या रंगाशी कट्टी.. ती दुरवरची दुनिया तिच्या साठी वेगळ्याच प्रकारे तिच्यासाठी जवळची झाली. त्या खिडकीपासून दूर राहणे कठीण होत गेलं तिच्यासाठी.. सगळे सांगायचे नको त्या रंगेबिरंगी काचेतून बघुस..त्या मधल्या झरोक्या मधून बघ. पण तिला मनातल्या जगाची जास्त ओढ होती. रंगीत स्वप्न आणि बेरंग सत्य याची सांगड घालता येईल का तिला??? #rajasthandiaries














