पुढची ‘ही’ अडचण नको म्हणून बिग बी करणार नाहीत नागराज सोबत काम वेब महाराष्ट्र टीम : मराठीसह देधभरातील विविध चित्रपट रसिकांना 'सैराट’ दिग्दर्शनं वेड लावणाऱ्या नागराज मंजुळे यांना अमिताभ बच्चन यांनी मोठा धक्का दिला आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत एका नव्या पर्वाची सुरुवात करण्याऱ्या नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ‘सैराट’च्या निमित्ताने एक वेगळ्याच वास्तवदर्शी कथानकाचे सादरीकरण केल्यानंतर ते ‘झुंड’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती करणार होते. किंबहुना लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार होती पण, अचानकच नागराज मंजुळे यांना चित्रपटाच्या सुरुवातीलात एक धक्का बसल्याचं कळत आहे. ‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी अमिताभ बच्चन एका निवृत्त क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेत दिसणार होते पण, आता मात्र त्यांनी या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतल्याचं कळत आहे, गेल्या वर्षीपासूनच बिग बींनी या चित्रपटात काम करण्याची तयारी दाखवली होती पण, कोणतंही कारण न देता या चित्रपटाछे चित्रीकरण वारंवार लांबवलं जात होतं शिवाय इतर चित्रपट निर्मात्यांनाही त्यांनी आपल्या तारखा देणं अपेक्षित होते. त्यामुळे फार काळ प्रतिक्षा न करता त्यांनी आता या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. चित्रपटापासून मागे फिरण्यामागे आणखीही एक कारण म्हणजे ज्यामध्ये कॉपीराइटचाही महत्त्वाचा मुद्दा असल्याचे समजते. त्यामुळे आता ‘झुंड’ साकारणाऱ्या मंजुळेंपुढे मोठी अडचण उभी राहिली आहे, असं म्हणावे लागेल.












